प्रत्येक भारतीयाला नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांचे ध्येय साकार करण्यासाठी,
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठा योजनेला मोठे पाठबळ जलजीवन मिशन अंतर्गत केंद्राने 2021-22 साठी 7,064 कोटी रुपयांचे दिले अनुदान Posted Date:- Jun 10, 2021 नवी दिल्ली, 10 जून 2021 प्रत्येक भारतीयाला नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांचे ध्येय साकार करण्यासाठी, जलजीवन मिशन अंतर्गत 2021-22 साठी अनुदानात वाढ करत केन्द्र सरकारने महाराष्ट्राला 7,064.41 कोटी रुपये दिले आहेत. 2020-21 मधे हे अनुदान 1,828.92 कोटी रुपये होते. केन्द्रीय जलशक्ती मंत्री श्री गजेन्द्र सिंग शेखावत यांनी चौपटीने केलेल्या या वाढीला मंजूरी देताना, 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहचवण्यात राज्यांना पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील एकूण 142 लाख घरांपैकी 91.30 लाख घरांना (64.14%) नळजोडणी दिली आहे. जलजीवन मिशन 15 ऑगस्ट 2019 रोजी सुरु झाले, तेव्हा केवळ 48.43 लाख (34.02%) घरांनाच नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. राज्यात केवळ 21 महिन्यांमधे 42.86 लाख घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. ...