जागतिक बालमजुरीविरोधी दिनाची संकल्पना आहे. बाल मजुरीची पद्धत संपूर्णपणे थांबविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृतीवर ती केंद्रीभूत आहे.
जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्यावरील चित्रपटाचे प्रसारण
Posted Date:- Jun 11, 2021 जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त उद्या दिनांक 12 जून 2021 रोजी, फिल्म्स प्रभाग नोबेल पारितोषिक विजेते आणि बालमजुरी विरुध्दच्या लढ्यात मोठे योगदान देणारे कैलाश सत्यार्थी यांच्या कार्याची महती अधोरेखित करणारा माहितीपट प्रसारित करणार आहे. हा चित्रपट फिल्म प्रभागाच्या संकेतस्थळावरून तसेच यू-ट्यूब वाहिनीवरून प्रदर्शित होईल.
“आत्ताच कृती करा: बालमजुरी थांबवा” ही यावर्षीच्या जागतिक बालमजुरीविरोधी दिनाची संकल्पना आहे. बाल मजुरीची पद्धत संपूर्णपणे थांबविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृतीवर ती केंद्रीभूत आहे. चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा सुरु ठेवत, फिल्म प्रभागाने बाल गुलामगिरी आणि लहान मुलांचे शोषण थांबविण्यासाठी जागतिक पातळीवरील चळवळीत आघाडीवर असणारे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांच्या या क्षेत्रातील योगदानाला अधोरेखित करणाऱ्या माहितीपटाचे प्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. सत्यार्थी यांनी त्यांच्या कार्यातून बालकांच्या शिक्षण घेण्याच्या जागतिक हक्काबाबत देखील प्रचार केला आहे. बालकांच्या गुलामगिरीविरुध्द लढा उभारण्याच्या कार्याबद्दलच्या 2014 सालच्या नोबेल पारितोषिकाचे ते सह-विजेते आहेत.

हा चित्रपट https://filmsdivision.org/ या संकेतस्थळावर “या आठवड्याचा विशेष माहितीपट” म्हणून प्रदर्शित होईल तसेच https://www.youtube.com/user/FilmsDivision या संकेतस्थळावर 12 जून 2021 ला संपूर्ण दिवसभर पाहता येईल.