कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपल्याला संसर्ग होवू नये म्हणून वाफ घेण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी देत आहेत . वाफ घेतल्यानं कोरोना बरा होतो असं अनेकांकडून सांगण्यात येतंय. कोरोनाचे प्रमुख लक्षणं म्हणजे ताप सर्दी खोकला आणि न्यूमोनिया. वाफ घेतल्यामुळे सर्दी किंवा कफ तुमच्या शरीरात राहत नाही
बामणोली परिसरातील २० गावांना मिनी वाफ मशीनचे मोफत वितरण . करन्यात आले बामणोली परिसरातील दुर्गम गावांना कोरोना पासून प्राथमिक उपचार होण्यासाठी समाज सेवक रामचंद्र मालुसरे केळघर सोळशी यांनी स्वखर्चातून मोफत वाफ मशीनचे नुकतेच वाटप करण्यात आले .बामणोली परिसरातील दुर्गम गावातील आजारी रूग्णांना दवाखान्यापर्यंत पोहचण्यास खूप अडीअडचणींचा सामना करावा लागतो . यावर उपाय म्हणून केळघर सोळशी ग्रामपंचायतीने या मशीन मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले . रामचंद्र मालुसरे यांनी या मशीन्ससकेळघर सोळशी ८०, तेटली २२ , आपटी ११, सावरी ६, पाली ५, फुरुस ५ , तापोळा ११, म्हावशी ७, उंबरी ३, बामणोली ९, अंधारी३, फळणी ३, पावशेवाडी ७ व बामणोली प्रा.आरोग्य केंद्र १० अशा सुमारे २० गावामध्ये २०० मशीन्सचे गावोगावी जाऊन . वितरण करण्यात आले .यावेळी केळघर च्या सरपंच सुनिता आटाळे, रामचंद्र मालुसरे, एकनाथ मालुसरे, गोपाळ शिंदे, सुरेश मालुसरे, प्रकाश सुतार ओबीसी भाजपा अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. या मशीनचा गरजू रुग्णांना फायदा होणार आहे . सर्व ग्रामस्थांनी रामचंद्र मालुसरे यांच्या या समाज उपयोगी कामाबद्दल त्यांना धन्यवाद दिले . बामणोली प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी ज्ञानेश्वर मोरे यांना या मशीन सुपूर्द करताना रामचंद्र मालूसरे व सहकारी नागरिक उपस्थित होते